मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त विधान केल्यांमुळे वादंग निर्माण झाले आहे. अशातच यावरून आता उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला राज्यपाल आणि त्रिवेदीची बुद्धी भ्रष्ट झाली? लाज वाटत नाही का? अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवाजी महाराजांनी लोकशाहीची संकल्पना मांडली. शिवाजी महाराजांनी।नेहमी रयतेचं राज्य मानलं. त्यांनी स्वतःचे राज्य कधीच मानले नाही. त्यांनी कधीही मीपणाला थारा दिला नाही. मी म्हणजे समाज असं ते मानायचे त्यामुळे या देशाला जर महासत्ता बनवायची असेल तर शिवाजी महाराजांचे विचार महत्वाचे आहेत असं उदयनराजे यांनी म्हंटल. आजपर्यंत कोणाचा आदर्श घेऊन वाटचाल झाली? त्रिवेदी म्हणाला माफी मागितली, याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? यांना लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल उदयनराजे यांनी केला. तसेच राज्यपालांनी ज्यावेळी शिवाजी महाराज यांच्याबाबत विधान केलं त्यावेळी मंचावर उपस्थित शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही, असा सवालही उदयनराजे यांनी विचारलं.
शिवाजी महाराज अनेक महापुरुषांचे स्फूर्तीस्थान होते. मग आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या शिवरायांचे विचार जुने कसे?, असा सवाल करत राज्यपाल कोश्यारींना पदावरुन मुक्त करावे अशी मागणी उदयनराजे यांनी केली. तसेच शिवरायांनी औरंगजेबाची माफी मागितलं असं विधान करणाऱ्या त्रिवेदीची हकालपट्टी केली पाहिजे असेही उदयनराजे भोसले यांनी म्हंटल.