जामनेर – तालुक्यातील बाजार समितीच्या जामनेर, पहूर व शेंदुर्णी आवारात सीसीआयतर्फे येत्या दोन दिवसात कापूस खरेदी सुरू होणार आहे. योग्य गुणवत्ता व दर्जा असलेल्या कापसाला ५३५५ ते ५५५० रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळेल, अशी माहिती बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील यांनी दिली.
गारखेडा शिवारातील मे. आरएम इंड्रस्टीज, पहूर येथील तिरुपती जिनिंग आणि शेंदुर्णी येथील गोपाला अॅग्रो इंडस्ट्रीज अशा तीन ठिकाणी कापसाची खरेदी होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा कपाशीची पीक क्षेत्र नोंद असलेला ऑनलाईन सातबारा उतारा, खातेउतारा, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक व राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत बाजार समितीच्या कार्यालयात सादर करावी. यानंतर टोकन पद्धतीने शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी होईल, अशी माहिती देण्यात आली.














