जळगाव : राज्यात राजकीय नेत्यांचे एकामागून एक येणाऱ्या वक्तव्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याच्या चर्चांना चांगलंच बळ मिळतंय. राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांनी सरकारला धोका असल्याचं भाकित केलंय. मात्र यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलंय.
विशेष म्हणजे काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्याच नांदेड जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. ते म्हणाले, ‘ राज्यभरातले अनेक नेते भाजपात येण्याच्या मार्गावर आहेत. संपर्कातही आहेत.
आपल्याला आश्चर्य वाटेल, आता मी नावं कोट करणार नाही. फक्त या जिल्ह्यातलेच नाहीत. तर महाराष्ट्रातून अनेक लोकं, बडे मंडळी… आपल्या पक्षाचं भवितव्यं काय हे, ज्यांना कळतंय. त्यांना बऱ्याच जणांना भाजपात येण्याची इच्छा आहे, असे ते म्हणाले आहे. महाजन यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा आता काँग्रेसला खिंडार पाडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
यापूर्वी औरंगाबादमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनीही मोठं वक्तव्य केलंय. शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा प्लॅन तयार ठेवलाय. शिंदे गटाचे 16 आमदार बाद होण्याची भीती असल्याने काँग्रेसचे 22 आमदार फडणवीस यांनी गळाला लावले आहेत. फडणवीस तसे हुशार आहेत, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय.
हे सुद्धा वाचा..
निवृत्तीनंतरही मासिक उत्पन्न हवेय? मग या 2 सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा
‘पप्पांनी माझ्यासोबत 20 दिवस घाणेरडे काम केले’, फोनवर मुलीची आपबिती ऐकून आईला बसला धक्का
फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत”, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी : नाशिक रेल्वे स्थानकावर शालिमार एक्स्प्रेसच्या बोगील आग
त्याआधी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डी येथील अधिवेशन संपल्यानंतर शिंदे सरकार कोसळणार असं भाकित केलंय. त्यामुळे राज्यात सध्या शिंदे सरकार कोसळण्याच्या चर्चांनी चांगलाच जोर पकडल्याचं चित्र आहे.