जळगाव: शिंदे गटाचे सदस्य आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. यावरही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अधिवेशन संपलंय. पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत, असं सांगतानाच आमचं सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
हे सुद्धा वाचा..
फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत”, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी : नाशिक रेल्वे स्थानकावर शालिमार एक्स्प्रेसच्या बोगील आग
या राशीच्या लोकांना आज ग्रहांची साथ मिळेल, करिअरमध्ये प्रगती होईल; वाचा आजचे राशिभविष्य?
हवाई दलात 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..
ज्या घरात वाढले, ज्या घराने ओळख दिली त्या घरात गद्दारी करणं चुकीचं आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी पलटवार केला आहे. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे? आम्ही मूळ शिवसेना आहोत. बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे. आम्ही भाजपमध्ये गेलो का?bआम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत, असा दावा त्यांनी केला.