मुंबई : शिवसेना फुटल्यामुळे राज्यातील सर्वात मोठा राजकीय भूकंप घडला. आता काँग्रेसचे 22 आमदार फुटणार आहेत, असा दावा ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने केला आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. जरी हे आमदार अपात्र ठरले, तरीदेखील शिंदे सरकार पडणार नाही याची तजवीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून ठेवली असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
“देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवून घेतील.कारण मुख्यंमत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांचा चेहरा किती पडलेला असतो. हे सगळं असताना त्यांचे डावपेच सुरू असतात”, असे चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले.
हे सुद्धा वाचा..
मोठी बातमी : नाशिक रेल्वे स्थानकावर शालिमार एक्स्प्रेसच्या बोगील आग
या राशीच्या लोकांना आज ग्रहांची साथ मिळेल, करिअरमध्ये प्रगती होईल; वाचा आजचे राशिभविष्य?
हवाई दलात 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..
तसेच राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे मोठे विधानदेखील त्यांनी यावेळी केले. “निवडणुका कधीही लागू शकतात. राष्ट्रपती राजवटही लागू शकते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे हे राज्यपाल कसं काम करतात. आपले १२ लोक त्यांनी घेतले नाहीत. आपलं कोणतंच काम केलं नाही”, असे म्हणत त्यांनी सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.