जळगाव : शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे या आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांची पहिलीच सभा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचं होमटाऊन असलेल्या धरणगाव शहरात होत आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे तीन महिन्यापूर्वीच पक्षात (उद्धव ठाकरे गट) आल्या असून त्या तीन महिन्यांचं बाळ असल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
चोपडा मतदार संघातील धानोरा गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा पार पडला. यादरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
सुषमा अंधारे यांना बाई म्हणत गुलाबराव पाटील म्हणाले की, या बाईने बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली चिखलफेक, तसेच हिंदू देवतांवर त्या काय काय बोलल्या आहेत, त्याच्याही क्लिप दाखवाव्यात. आम्ही आमच्यावर केलेल्या टीका सहन करणार नाही, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अंधारे यांना दिला आहे.
हे देखील वाचा..
गरोदर महिलांना शासनाकडून मिळते इतक्या रुपयांची आर्थिक मदत, असा घ्या लाभ
जनतेला दिलासा; गॅस सिलिंडर झाला स्वस्त, वाचा आता नवीन दर?
‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर ; महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश
अग्निवीरांसाठी भरती जाहीर ; अर्ज करण्यासाठी डिटेल्स वाचा
रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार आज रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्यासह ते आमदार होते त्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा हे दोघेही मित्र आहेत. त्यांनी समजून घेतल पाहिजे, हीच आपली भावना होती, नेत्यांच्या बैठकीत त्यांनी समजून घेतलं आणि निर्णय घेतला. यातून लोकांचा सभ्रम दूर करण्याचा प्रयत्न दोघानांही केला’, असं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.