जळगाव,(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे आमदार किशोरअप्पा पाटलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंवर निशाणा साधला असून सुषमा अंधारे आमच्या बंडामुळे उजेडात आल्या, त्या या पूर्वी उजेडातही दिसत नव्हत्या असं म्हणत टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झाल्यापासून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका करण्यास कुठलीच कसर सोडलेली नाही त्यामुळे आता सुषमा अंधारे सुद्धा शिंदे गटाकडून लक्ष होतांना दिसत आहेत.
…तर संधीचं सोनं करिन – किशोरअप्पा पाटील
राज्यात शिंदे – फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार नोव्हेंबर महिन्यात होण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार वेळी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षाही आमदार किशोर पाटलांनी बोलून दाखवली आहे.संधी मिळाली तर सोनं करिन असं देखील आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्याच बरोबर सुषमा अंधारे आमच्या बंडामुळे उजेडात आल्या, अशी टीका करत अंधारेंनी आम्हा सर्व आमदारांचे आभार मानावेत, असा सल्लाही यावेळी किशोर पाटलांनी दिला आहे.