मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही महिन्यात नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेर्तृत्वाखाली ५० आमदारांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. आणि त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मात्र आता शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला. या आरोपानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत
आमदार रवी राणा यांच्या आरोपावर आमदार बच्चू कडू यांनी दंड थोपाटले असून या प्रकरणात बच्चू कडू गेल्या तीन दिवसांपासून राज्य सरकारला वारंवार इशारा देत आहेत. आता तर त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. बॉम्ब कुठे आणि कसा फोडायचा हे आपल्याला बरोबर माहीत आहे, असं सांगतानाच उद्या राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर. आता आरपारची लढाई लढणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
माझा इशारा हा फुसका बार आहे की बॅाम्ब आहे, हे 1 तारखेला दाखवू. हा बॉम्ब कसा कुणाच्या खाली लावायचा हे बच्चू कडूला चांगलं माहीत आहे. बॉम्ब कसा आहे हे 1 तारखेला कळेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलायला हवं, नाही तर आम्ही आमचं काम करू. अस्तित्वंच धोक्यात येत असेल तर मग याचं काय करणार? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
हे पण वाचा..
या लोकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना तुरुंगात पाठवा… मृत्यूपूर्वी मुलीचा Video व्हायरल
चहासोबत चुकूनही ‘हे’ 6 पदार्थ खाऊ नका.. अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ; काय आहे आजचा भाव??
क्या बात है! पात्रता फक्त 10वी पास.. कॉन्स्टेबलच्या 24,369 जागांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज
तक्रारीची दखल घेतात नाही घेत यांचं मला काही घेणं नाही. फिकर नाही. मी नंगा होईल. बच्चू कडूंचं राजकारण चुलीत गेलं तरी बेहत्तर. राजकारण सोडावं लागलं तरी बेहत्तर. उद्या राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर. एकदा आमच्या डोक्याच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही आरपारची लढाई करतो. तुम्ही चुकीच्या पद्धतीने आरोप करत असाल तर आम्ही आंडूपांडू थोडीच आहोत. आम्ही शेतकरी आहोत. जिथं मोकळं रान आहे तिथे नांगर घालू, असा इशारा त्यांनी दिला.