मुंबई : राज्यात सध्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. तो म्हणजे ठाकरे गटाकडून मागच्या दोन दिवसांपूर्वी तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्रं जमा केली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञपत्र पुन्हा निवडणूक आयोगाने बाद ठरवली आहेत. दरम्यान ही माहिती चुकीची असल्याची माहिती ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकीचा असल्याने ती प्रतिज्ञपत्र चुकीची असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने जो काही मजकूर ठरवून दिला होता त्या प्रमाणे न दिल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे. हे नियम पाळण्यात न आल्यानेच ही प्रतिज्ञापत्रं नाकारण्यात आली आहेत. दरम्यान उर्वरित साडे आठ लाख प्रतिज्ञापत्रं स्वीकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हे पण वाचा :
शिंदे गटातील आ.पाटलांनी केली ठाकरे गटात असलेल्या बहिणीकडे जाऊन भाऊबीज साजरी
शिंदे गटाला लागणार ग्रहण? राष्ट्रवादीच्या दाव्याने राजकारणात उडाली खळबळ
बाप-लेकाची एकाच दिवशी निघाली अंत्ययात्रा ; पाचोरा तालुक्यातील घटना
यावर ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग म्हणाले की, निवडणूक आयोगाने आपल्याला यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नसल्याची माहिती ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी माध्यमांना माहिती दिली. ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी आपण आयोगाने दिलेल्या फॉरमॅटनुसारच प्रतिज्ञापत्रं दिली असून, हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे