मुंबई,(प्रतिनिधी)- मासूचा ३ रा स्थापना दिवस दिनांक १५ ऑक्टोबर, २०२२ रोजी डोंबिवली येथील वैशालीताई जोंधळे सभागृह येथे हर्षो- उल्लासात, शेकडो उपस्थितांच्या साक्षीने पार संपन्न झाला. मासुचे महासचिव अॅड. प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली तालुका कमिटीने अपार मेहनत घेऊन हा स्थापना दिवस संस्मरणीय केला. या सोहळ्याला जळगाव, धुळे नंदुरबार,औरंगाबाद, अमरावती, नाशिक,ठाणे ,भिवंडी, विरार, रायगड, वाडा , कर्जत, येथून मासुचे पदाधिकारी आणि सहकारी या सोहळ्यास उपस्थित होते.
मासूच्या मुंबई प्रदेशचे नेतृत्व श्री. विकास शिंदे तर औरंगाबाद जिल्ह्याचे श्री. नजीब फारुकी आणि भिवंडी व कर्जत तालुक्याचे नेतृत्व अनुक्रमे अॅड. पूजा टाळे व अॅड. क्रांती अभंगे यांच्याकडे सोपविण्यात आले.
तीन वर्षात पहिल्यांदाच प्राथमिक सदस्य नोंदणी सुरु करण्यात आली असून मुख्यत्वे बेरोजगारांची नोंदणी ह्या उपक्रममाचे अनावरण प्रमुख अतिथी अॅड.जमशेद मिस्त्री यांच्या हस्ते तसेच मासूची मोहीम, ध्येय,भूमिका व पुढील दिशा विद्यार्थ्यांना व तरुणांना समजण्यासाठी मासूच्या जाहीरनाम्याचे अनावरण विशेष अतिथी अॅड. मोहिनी प्रिया यांच्या हस्ते करण्यात आले.