जळगाव । जळगावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे जळगावमधील एका डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून ७ लाख रुपयाची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात ४ महिला व ३ तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना
जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालय समोरील मॅक्स क्रिटिकल केअरमध्ये सेवा बजावणारे डॉ.चरणसिंग चव्हाण (रा.रामानंद जळगाव) हे व्यवसायाने डॉक्टर असून दि.१५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान काही तरुण तरुणींनी त्यांना अडकविण्याच्या उद्देशाने कट तयार केला. एका तरुणीने डॉक्टरांना शरीरसुखाची ऑफर देत त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग केले. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ७ लाखांची खंडणी मागितली. इतर तरुणांनी डॉक्टरांना मारहाण करीत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पैसे दिले नाही तर व्हिडीओ समाजात व्हायरल करीत जिवनातून उठवून टाकण्याची धमकी दिली.
हे सुद्धा वाचा..
पुन्हा निर्भया कांड : 2 दिवस 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला रॉड
अहो आंटी, सोडा.. मुंबई लोकलमधील महिलांच्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
उत्तर महाराष्ट्रात भाजपला धक्का ; ‘या’ माजी आमदाराचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
सरकारच्या ‘या’ योजनेत 210 रुपये जमा करा अन् दरमहा 5000 मिळावा
दरम्यान, या बाबत डॉक्टर चरणसिंग जयसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.