मुंबई : सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या भावात हालचाल दिसून येतेय. मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली. मात्र आज या घसरणीला ब्रेक लागलं आहे. आज गुरुवारी (13 ऑक्टोबर रोजी) आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. तर चांदीच्याही दरात थोडी वाढ झाली असली तरी जागतिक बाजारात त्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. MCX वर, गुरुवारी सुरुवातीला सोन्याचा भाव 0.02 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत 0.04 टक्क्यांनी वाढली.
MCX वर आज सकाळी 9:25 वाजता 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 11 रुपयांनी वाढून 50,916 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तसेच MCX वर आज चांदीच्या किंमतीत किंचित वाढ दिसून येत आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.32 टक्क्यांनी वाढून $1,669.0.6 प्रति औंस झाली. तसेच चांदीची स्पॉट प्राईस आज 0.79 टक्क्यांनी घसरून $ 18.98 प्रति औंस झाली आहे. Gold Price Today
हे सुद्धा वाचा..
मोदी सरकारने केली मोठी घोषणा, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, एलपीजीच्या किमतीही कमी होणार!
खळबळजनक ; जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील कुंटखाण्यावर छापेमारी, तरूणी, महिलांसह पुरुष ताब्यात
राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या ; , कुणाची कुठे बदली? पहा यादी
IRCTC मध्ये 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,030 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,000 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,030 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात