जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघात लोणी व दूध पावडरमध्ये कोट्यावधीचा अपहार झाल्याबाबतची तक्रार भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे केली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर कुणावर काय कारवाई होते हे पाहणे गरजेचे आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जळगाव जिल्हा दूध संघात यापूर्वी चांगल्या तुपाची परस्पर विल्हेवाट लावून मोठा अपहार केला होता. याच पद्धतीने अलीकडच्या काळात जिल्हा दूध संघाच्या फिनिश प्रॉडक्ट विभागाच्या रेकॉर्डला १४ टन बटर अर्थात लोणी पाठवल्याची नोंद २ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आली आहे. सदरील बटर हे अतिरिक्त प्रॉडक्ट असल्यामुळे इतरत्र असलेल्या कोल्ड स्टोरेजच्या ठिकाणी पाठविण्यात आले. जसे की यामध्ये सातारा येथील पी.डी. शहा अँड सन्स वाई या ठिकाणी पाठविण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे.
हे पण वाचा :
एका बिअरने उघडले पत्नी आणि मुलाच्या हत्येचे गुपित! नेमकी काय आहे घटना?
खुशखबर…! धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीत विक्रमी घसरण, काय आहे आजचा भाव?
महिलेसोबत न्यूड कॉल महागात पडला, जळगावातील एकाला मागितले 2 लाख
खळबळजनक : भाजपच्या शहराध्यक्षाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
परंतू तेथून परत आलेला मालात ७० ते ७५ टक्के हा विकास अर्थात जिल्हा दूध संघाच्या प्रॉडक्शन नव्हता. यामध्ये जिल्हा दूध संघाचे फक्त शंभर ते दीडशे खोके आढळून आले. उर्वरित माल हा बिना खोक्याचा आहे. म्हणजेच जळगाव दूध संघाचे पॅकिंग नाही. यात चेअरमन कार्यकारी संचालक व काही मोजके कर्मचारी यांनी अत्यंत हुशारीने व नियोजनबद्ध रित्याविकाचे चांगल्या प्रतीचे व ब्रँड असल्यास मागणी असलेले बटर अर्थात लोणी हे परस्पर विकून टाकलेले असून दूध संघाचे फसवणूक केली आहे. असाच प्रकार ८ ते ९ मॅट्रिक टन दुधाची भुकटीचाही देखील झालेला आहे. तो देखील गायब झाला असून त्याची परस्पर विक्री करण्यात आली आहे.
त्यामध्ये देखील दोन ते अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान याची चौकशी अहवाल सादर करून तात्काळ शहर पोलीस ठाण्यात प्राथमिक अहवाल नोंदवून घ्यावा, अशी मागणी चाळीसगाव तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.