डोंबिवली : शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या प्रकरणाबाबतची निवडणूक आयोगासमोरील पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अशातच आता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
सरसेनापती बाळासाहेबांनी ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याच्या जोरावर महाराष्ट्रामधील अनेक सत्ता केंद्रांवर त्यांनी सत्ता मिळवली. राज्य सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले. ही वर्षानुवर्षाची पुण्याई आहे ती दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही, हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावरच समजेल. परंतु, तात्पुरते का होईना निवडणूक चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक आहे अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
हे पण वाचाच :
हातात पिस्तुल घेऊन स्टेजवर डान्स, तरुणीच्या ‘या’ VIDEO ने इंटरनेटवर घातला धुमाकूळ
पतीचे दुसऱ्या तरुणीसह अनैतिक संबंध ; नंतर पतीने जे केलं ते धक्कादायकच
शिवसेनेचं नवं चिन्ह काय असणार? उद्धव ठाकरेंच्या खास माणसाचे ट्विट करत जाहीर केलं नाव आणि फोटो
सणासुदीच्या खरेदीवर SBI देतेय कॅशबॅक ; ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंतच
आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने लेवा पाटील समाजातील लेखक खेमचंद पाटील लिखित ‘लेवा साहित्यिक रत्ने’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व लेवा साहित्यिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्र माला माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे उपस्थित होते.