फतेहपूर : यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यात नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित जागरण कार्यक्रमादरम्यान हनुमानजींची भूमिका साकारणाऱ्या एका वृद्धाचा अचानक मृत्यू झाला. राम स्वरूप (६५) असे मृताचे नाव असून ही संपूर्ण घटना आणि या व्यक्तीचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून लोकांना मोठा धक्का बसला आहे.
https://twitter.com/rishabhmanitrip/status/1576589257317429249
नवरात्रीनिमित्त सलेमपूरमध्ये देवीच्या जागरणाचा कार्यक्रम सुरू होता. शनिवारी रात्री रामलीलेचं आयोजन करण्यात आलं होतं. गावातील 50 वर्षीय रामस्वरूप हनुमानाची भूमिका साकारत होते. लंकेला आग लावण्यासाठी त्यांची शेपटी पेटवली गेली. मात्र, एका मिनिटानंतर त्यांना अचानक झटका आला. यात ते स्टेजवरुन डोक्यावर पडले. लोकांनी त्यांना उचलण्यासाठी धाव घेतली आणि रुग्णालयात नेलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
शेकडो लोकांनी पाहिला मृत्यू
हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेली मृताची पत्नी अनुसया आणि शेकडो लोकांनी डोळ्यासमोर या व्यक्तीचा मृत्यू पाहिला. सरपंच गुलाब यांनी सांगितलं की, हा कार्यक्रम पाहण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. पोलिसांना न सांगता कुटुंबीयांनी रविवारी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, कलाकाराच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गावात पोहोचून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.