नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने यावर्षीही आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे. दिवाळीच्या सणापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस म्हणून सुमारे १७ हजार ९५१ रुपये जमा होणार आहेत. सुमारे 11.27 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. हा सणाचा बोनस दसऱ्यापूर्वी दिला जाईल. हा बोनस वाटण्यासाठी रेल्वे विभागाकडून 1832.09 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
निर्णय मंजूर
रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रोडक्शन लिंक्ड बोनसच्या देयकासाठी विहित केलेली मर्यादा म्हणजे PLB रु.7,000/- प्रति महिना आहे. या अंतर्गत, प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला 78 दिवसांसाठी देय असलेली कमाल रक्कम 17,951 रुपये असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षी 2021 मध्ये देखील रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्यात आला होता.
हे पण वाचा :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 8वी ते ग्रॅज्युएटसाठी बंपर भरती
धारदार चाकूने हल्ला करत तरुणाचा खून, घटनेचा अंगावर काटा आणणारा Video समोर
PM किसान : 12 व्या हप्त्याचे पैसे मिळणार की नाही, घरी बसून जाणून घ्या, ही आहे संपूर्ण प्रक्रिया
पहिले तू सुधर…लोकांचं काय पाहतो.. ‘या’ नेत्यावर मंत्री गुलाबराव पाटलांची एकेरी शब्दात टीका
प्रोत्साहनासाठी बोनस
रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रवासी आणि मालवाहतूक सेवांच्या कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आमच्या या रेल्वे कर्मचाऱ्यांनी देशाची अर्थव्यवस्था पुढे नेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. PLB चे पेमेंट प्रोत्साहन म्हणून काम करेल. यामुळे मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचार्यांना, विशेषत: जे लोक रेल्वेचे कार्यप्रदर्शन आणि ऑपरेशनमध्ये गुंतलेले आहेत, त्यांची उत्पादकता सुधारण्यासाठी आणि रेल्वे ग्राहकांना सुरक्षितता, वेग आणि सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रेरित करण्यात मदत करेल. पीएलबी भरल्याने येत्या सणांमध्ये अर्थव्यवस्थेतील मागणीलाही चालना मिळेल.