जळगाव (प्रतिनिधी) दि. 28 –शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरीता शासनाची शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना. सामूहिक /नोंदणीकृत विवाह करणाऱ्या शेतकरी / शंतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे रु. 10,000/- ( रुपये:- दहा हजार मात्र )एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचा खर्च भागविण्याकरीता देण्यात येते.
खालील अटींची पुर्तता करावी लागणार…
वधू जळगाव जिल्हयाची स्थानिक रहिवाशी असावी. • शेतकरी असल्यास 7/12 चा उतारा व शेत मजूर असल्यास भूमीहीन शेतमजूर असल्याचा दाखला. उत्पन्नाची मर्यादा – वधूच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा जास्त असू नये त्यासाठी उत्पन्नाचा दाखला.
या कार्यालयाकडून सदर योजनेचा लाभ खुला व इतर मागास वर्गाच्या प्रवर्गासाठीच येतो. या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अनुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्य पात्र राहणार नाही कारण, त्यांच्या साठी सामाजिक व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वंतत्र योजना राबविण्यात येत आहे.
नोंदणीकृत विवाह (Registered Marriage प्रमाणपत्रसामूहिक विवाह अथवा सरळ विवाह नोंदणी कार्यालयात (Office of the Registrar of Marriage) जावून नोंदणीकृत करणारे जोडपे.
बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंध कायदयाचा भंग न केल्याबाबतचे विहीत नमुन्यात रुपये :-20/- स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकारी याचा समोर केलेले प्रतिज्ञापत्र सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहिल. नोंदणीकृत एका स्वयंसेवी संस्थेस एका सोहळयात किमान 5 व कमाल 100 जोडप्याचा समावेश करण्याची परवानगी राहिल. अधिक माहिती करीता संपर्क जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जळगाव दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी जवळ, जळगाव दुरध्वनी क्रमांक 0257-2228828 असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.