मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहे. बळीराजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असून अशातच शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरु करण्यात आली आहे. ती म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana). या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्यात पेन्शनचा लाभ मिळतो. मात्र, या योजनेचा लाभ सर्वांनाच मिळणार नाही तर काही शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
लहान शेतकरी आणि ज्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंतची शेतजमीन आहे. तसेच त्यांचे वय 18 ते 40 वयोगटातील आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. पीएम किसान मानधन वेबसाईटनुसार, अशा शेतकऱ्यांचे नाव 1 ऑगस्ट 2019 पर्यंत राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या भूमी रेकॉर्डमध्ये असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न हे 15000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असायला हवे. यासोबतच त्यांच्याकडे आधार कार्ड आणि IFSC सोबतच एक सेव्हिंग बँक अकाऊंट किंवा जनधन अकाऊंट नंबर असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :
शेवटच्या चॅटमध्ये दडले अंकिताच्या खुनाचे रहस्य, वाचा संपूर्ण चॅट
योजनेसाठी कोण पात्र?
राष्ट्रीय पेन्शन स्किम, कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी निधी संगठन योजना सारख्या इतर योजने अंतर्गत येणारे.
ज्या शेतकऱ्यांनी श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून प्रशासित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा पर्याय निवडला आहे.
संस्थागत भूमीधारक
संविधानिक पदावर कार्य केलेले किंवा कार्यरत असलेले व्यक्ती
माजी किंवा वर्तमान मंत्री, राज्य मंत्री आणि लोकसभा, राज्यसभा, विधानसभ, विधानपरिषदेचे माजी सदस्य किंवा वर्तमान सदस्य, महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष.
या गोष्टीची काळजी घ्या
जोपर्यंत पात्र असलेले शेतकरी वयाच्या 60 वर्षांपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत 18 ते 40 वयोगटातील पॉलिसीधारकांना 55 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत मासिक योगदान करावे लागणार आहे. 60 वर्षानंतर अर्जदाराला पेन्शनसाठी क्लेम करावे लागेल.