मुंबई : वाढत्या महागाईच्या सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पामतेलाच्या किमतीत घसरण होत असून ती एका वर्षातील नीचांकी पातळीवर आली आहे. पण एफएमसीजी कंपन्या पामतेलाच्या दरातील घसरण ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास टाळाटाळ करत आहेत आणि दरात कपात करत नाहीत.
कंपन्या दिलासा द्यायला तयार नाहीत
इंडोनेशियाच्या निर्बंधानंतर पाम तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. त्यानंतर सरकारच्या पातळीवर पुढाकार घेतल्याने दरात घसरण झाली. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पामतेल कमी होऊनही एफसीजी कंपन्या दिलासा देण्यास तयार नाहीत. कच्च्या मालाच्या किमतीमुळे किमतीत कपात करणे शक्य नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.
हे पण वाचा
विक्रमी घसरणीनंतर सोनं आणखी स्वस्त, चांदीही घसरली; हा आहे आजचा नवीनतम दर
खळबळजनक ! पत्नी घटस्फोट देत नाही, रागातून पतीने गाठली खालची पातळी
शेतकऱ्यांना वीजबिलात 12 हजार रुपये अनुदान ; लाखो शेतकरी घेत आहेत लाभ
आपले पराक्रम जनतेला सुद्धा माहितीय.. गिरीश महाजनांची अजित पवारांवर टीका
पामतेल प्रतिलिटर ९० रुपयांपर्यंत
येत्या काळात किंमत आणखी खाली येऊ शकते. दुसरीकडे, मोहरी पिकाची वेळ जसजशी जवळ येईल तसतसे भाव हळूहळू खाली येऊ शकतात. गेल्या एक ते दोन महिन्यांत गहू आणि तांदळाचे दर 15 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. पामतेल प्रतिलिटर ९० रुपयांपर्यंत खाली आले आहे.
दरम्यान, स्थानिक बाजारात सोयाबीन तेल पाऊच १३२ ते १४० रुपयापर्यंत होते; ते आता जवळपास १२० ते १२५ रुपयापर्यंत आले आहे. तसेच खुले एक किलो तेलाचा दर देखील जवळपास १२१ ते १२८ रुपायांवर आला आहे.