नवी दिल्ली: गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठामध्ये होत आहे. दरम्यान, या सुनावणीचे सर्व सामान्य नागरिकांना थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे.
या मुद्यावर होणार सुनावणी….
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करणे,परस्परांविरोधात याचिका तसेच विधानसभा अध्यक्षांची निवड या याचिकांसोबत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणाची सुनावणी करण्याची संमती देणे या मुद्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकते.