नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असताना आपण पाहत असतो. त्यातील काही व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही व्हिडिओ आपल्या मनाला लागतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
हि घटना उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील ओराई शहरामध्ये घडली आहे. यामध्ये एका महिलेची छेड काढल्यामुळे तरुणाला पीडित महिलेने बेदम मारहाण केली आहे. या व्हिडिओमध्ये हि महिला इतक्या वेगाने मारहाण करताना दिसत आहे कि यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कि मार खाणाऱ्या तरुणाची काय अवस्था झाली असेल.
महिलेची छेड काढणे पडले महागात! भररस्त्यात केली तरुणाची धुलाई pic.twitter.com/xDOi3By1nD
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 20, 2022
जेव्हा या माणसाने महिलेची छेड काढली, तेव्हा तो नशेत होता, ज्यामुळे त्याला काहीही लक्षात आलं नाही. अखरे महिलेचा चोप खाल्यानंतर या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पुढील कारवाई केली.