नवी दिल्ली : तुम्ही जर शिधापत्रिकाधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शिधापत्रिकाधारकांवर मोठी कारवाई करत सरकारने गेल्या काही दिवसांत सुमारे अडीच कोटी शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आली. राज्यसभेत भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ग्रामीण विकास आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी ही मोठी माहिती दिली.
महाराष्ट्रात २१.०३ लाख शिधापत्रिका रद्द
केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीत, 2017 ते 2021 या पाच वर्षांत देशात डुप्लिकेट, अपात्र आणि बनावट 2 कोटी 41 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकट्या बिहारमध्ये 7.10 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यादरम्यान यूपीमध्ये सर्वाधिक १.४२ कोटी शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्यात २१.०३ लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.
हे पण वाचा :
दररोज 14 ते 15 लोक माझ्यावर बलात्कार करायचे ; 14 वर्षांच्या तरुणीची हृदय हेलावून टाकणारी कहाणी
सोने 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ; वाचा आजचा 10 ग्रॅमचा नवीनतम दर
सुकी नदीपात्रात तब्बल २२ मृत बैल आढळले ; परिसरात खळबळ
7 मुली, 13 मुलं… पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला तेव्हा सर्वांनाच बसला धक्का
यावेळी सरकारने पुन्हा एक मोठे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA), रेशनचा लाभ घेतलेल्या 70 लाख कार्डधारकांचा संशयितांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा डेटा केंद्राने ग्राउंड व्हेरिफिकेशनसाठी राज्यांना पाठवला आहे. पडताळणीमध्ये, ज्यांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत ते NFSA अंतर्गत रेशन मिळण्यास पात्र आहेत की नाही हे शोधून काढले जाईल.
अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, जर 70 लाखांपैकी निम्मेही नियमानुसार योग्य आढळले नाहीत तर त्यांची जागा रद्द करून नवीन पात्रांना संधी दिली जाईल. शिधापत्रिका रद्द केल्यानंतर त्यांच्या जागी नवीन पात्रांची नावे जोडली जातात.