इंदापूर : महिलांसह मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालले असल्याचे दिसतेय. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. 13 वर्षीय दिव्यांग आणि भोळसर मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील गावात उघडकीस आलीय. धक्कादायक म्हणजे, मुलगी गरोदर राहिल्यामुळे प्रकरणाला वाच्यात फुटली. या प्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी महिला शुभांगी अमोल कुचेकर हिला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत वारंवार हा बलात्कार करण्यात आला. शुभांगी कुचेकर ही महिला सहावीत शिकणाऱ्या या मुलीला गोड बोलून फिरायला न्यायची आणि गाडीतून आलेल्या अनिल नलावडेबरोबर उसाच्या शेतात पाठवायची असा हा प्रकार घडला.
मागील आठवड्यात या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला बारामतीत तपासणीसाठी नेल्यानंतर ही मुलगी गरोदर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीने सर्व प्रकार सांगितला आणि मुलीच्या आईने वालचंदनगर पोलिसांकडे धाव घेतली.
हे पण वाचा..
कर्ज हवाय? येथे फक्त 10 मिनिटांत मिळेल कर्ज ; कधी आणि कसे घ्यायचे, जाणून घ्या
पंतप्रधान कृषी सिंचाई योजना: शेतकऱ्यांना सिंचन उपकरणांवर मिळेल तब्बल ‘इतके’ अनुदान
टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारीचा ; VIdeo झाला व्हायरल
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..
या प्रकरणातील आरोपी अनिल नलावडे आणि नाना बगाडे या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल नलावडे याने वारंवार या मुलीवर बलात्कार केल्याची फिर्याद या मुलीच्या आईने दिल्यानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.