वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी – एकूण जागा – १०७५ तर तंत्रज्ञ-ए – एकूण जागा – ८२६ जागासाठी पदभरती होतं आहे.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा कम्प्युटर सायन्स डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.