मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नव्याचे नऊ दिवस असतात. त्यांनी गप्पा मारणे बंद करावे कोणत्याही मतदारसंघात आव्हान द्या मी खंबीर आहे. यांचं विधानसभेत तिकीट कापलं, पत्नीला तिकीट नाकारलं हीच यांची पक्षातील विश्वासार्हता आहे का? असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी बावनकुळेंवर जोरदार टीका केली आहे.
तसेच त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. सध्याचे सरकार हे स्थगिती सरकार आहे. प्रत्येक विकास कामांना स्थगिती देण्याचे काम सध्या सुरू आहे. यांना खोके सरकार म्हटलं की राग येतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तर डिपॉझिट जप्त होईल?
बारामतीला धडाका घेण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, बारामतीला धडका घ्याल तर डिपॉझिट जप्त होईल असा इशारा यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मतदारसंघात आपली ताकत आहे, लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झालोय असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. ओबीसी आरक्षाबाबत बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक झालं. मात्र या आरक्षासाठी सर्व मेहनत ही महाविकास आघाडी सरकारने घेतली होती.