जळगाव : तुम्ही जर बिअरचे शौकीन असाल तर ही बातमी नक्कीच वाचा. कारण जळगावात बिअर पीताच एका तरुणाला उलटी झाल्याचा प्रकार उघडकीस आली. यानंतर तरुणांनी बियरची बाटली तपासली असता ती मुदतबाह्य असल्याचे समोर आले आहे. तरुणांच्या तक्रारीनंतर उत्पादक शुल्क विभागाने संबंधित वाईनवर कारवाई केली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात अशोक किराणा जवळ राज वाईन नावाचे वाईन शॉप आहे. याठिकाणी काही तरुण दुपारी बियर पीत होते. त्यातील एका तरुणाला बियर प्यायल्यानंतर उलटी झाली. त्यानंतर त्यांनी बियरच्या बाटलीवर बघितले तर ती मुदतबाह्य झालेली होती. त्यांनी लागलीच याची तक्रार केली.
हे पण वाचा :
गुडन्यूज : सणासुदीत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, इतक्या रुपयांनी कमी होऊ शकतात दर?
अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! वाचून व्हाल खुश..
चालत्या ट्रेनमध्ये मुलीचा पाय घसरला, पुढे काय झाले पाहा ‘या’ धक्कादायक Video
तरुणांच्या तक्रारीनंतर उत्पादक शुल्क विभागाने संबंधित राज वाईनवर कारवाई केली आहे. या कारवाईत दुकानात अमस्टल बिअरच्या १२४ बाटल्या आणि ५०० एम.एल.चे १० टीन मुदतबाह्य असल्याचे आढळून आले असून हा माल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईने खळबळ उडाली आहे.