
सनी भलेही परदेशात लहानाची मोठी झाली असेल मात्र ती भारतीय संस्कृतीतही तितकीच रमलेली पहायला मिळते.

सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण असताना सनीच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यानिमित्तानं सनीने एथनिक लुक केलेला पहायला मिळाला.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सनी लिओनी पिंक कलरच्या कुर्ती शरारामध्ये दिसली. सनीने तिचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सनीच्या या सोज्वळ सौदर्यांवर अनेकजण फिदा झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेक लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडताना दिसतोय.

‘परफेक्ट, सुंदर, लुकिंग प्रीटी, हार्ट इमोजी, फायर’, अशा भन्नाट कमेंट सनीच्या या पोस्टवर येताना दिसतायेत.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अभिनेत्रीने पती आणि मुलांसह पुजा केल्याचंही दिसून आलं.

दरम्यान, अनेक खडतर प्रवासानंतर, मेहनतीनंतर सनी इथपर्यंत पोहचली आहे. अनेकवेळा तिनं हे आपल्या मुलाखतीमधूनही बोलून दाखवलं आहे.