
‘शेतीचं किती नुकसान झालं आहे, याचं संपूर्ण डिटेल असेसमेंट मी शहा यांच्यासमोर ठेवलं आहे. यानंतर आवश्यक त्या मदतीसाठी ते नक्कीच पावले उचलतील. यासंदर्भातील एक दुष्काळ पाहणी पथकही महाराष्ट्रात येईल. शहा यांनी विविध सचिवांना माझ्यासमोर आमच्या बैठकीदरम्यान यासंदर्भात आदेश दिले,’ असंही फडणवीस यांनी
प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सरकार स्थापन होईल असे सांगतानाच ‘महायुतीचे सरकार’ असा शब्दप्रयोग टाळला, त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दुसरीकडे, आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची म्हणजेच शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सरकारस्थापनेची कोंडी आज दिल्लीत फुटणार असे चित्र दिसत आहे. दरम्यान, शहा-फडणवीस भेटीत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने काय चर्चा झाली हे फडणवीस यांनी गुलदस्त्यातच ठेवलं आहे.