मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. बंडखोरीच्या दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना मातोश्रीवर बोलावले होते. त्या वळेस सर्व आमदारांना विचारले होते काय हवे आहे. मुख्यमंत्री जर तुमच्या समर्थकाला व्हायचे असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खाली करायला तयार असल्याचे सांगितले होते, पण शपथ घेतलेले गुलाबराव पाटील दुसऱ्याच दिवशी पळून गेले’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील हे बोलतात त्यात तत्य काही नाही. ज्यावेळी आमदारांनी भेटीची वेळ मागितली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मातोश्रीवर बोलावले होते. उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांशी चहापान करत चर्चा केली होती. त्या वळेस सर्व आमदारांना विचारले होते काय हवे आहे. मुख्यमंत्री जर तुमच्या समर्थकाला व्हायचे असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खाली करायला तयार असल्याचे सांगितले होते.
त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व आमदारांची शिवसेनेसोबत राहणार, तुमच्यासापासून दूर जाणार नाही, अशी शपथ घेतली होती. पण दुसऱ्या दिवशी पळून गेले, असा पलटवार खासदार विनायक राऊत यांनी केला.