जळगाव | गेल्या काही दिवसापूर्वी युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे जळगाव दौरा रद्द करण्यात आला होता. आदित्य ठाकरे यांची तब्बेत खराब झाल्यामुळे हा दौरा रद्द झाला होता. मात्र आता आदित्य ठाकरे हे २० ऑगस्ट रोजी येणार असून त्यांच्या दौर्याचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आला आहे.
शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौर्यावर येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आदल्या दिवशी अचानक त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे हा दौरा स्थगित करण्यात आला होता. यानंतर आता त्यांचा दौरा नव्याने जाहीर झाला असून ते शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत.
हे पण वाचा :
शारिरीक संबंधातून प्रेयसी गर्भवती राहिल्यानंतर प्रियकराने घेतला ‘हा’ भयानक निर्णय
महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी
दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. आज सोने-चांदीच्या किमतीत झाली इतकी मोठी घसरण
मोठी दुर्घटना : ITBP च्या 39 जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, 6 जवान शहीद
अधिकृत दौर्यानुसार आदित्य ठाकरे यांचे सकाळी १०.४० वाजता विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर आकाशवाणी चौकात त्यांचे शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने भव्य स्वागत होणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता ते पाचोरा येथील सभेला हजेरी लावतील. तेथून त्यांचे एरंडोल येथे स्वागत होईल. तर पावणेदोन वाजता त्यांच्या उपस्थितीत धरणगावात शिवसंवाद मेळावा आयोजीत करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी तीन वाजता ते पारोळा येथील कार्यक्रमाला हजेरी लावतील. येथून ते धुळे येथे रवाना होणार आहेत.