बोदवड, (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद मराठी शाळा मनुर बुद्रुक या विद्यादेवतेच्या प्रांगणात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साही आनंदी वातावरणात दिनांक 15 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. शालेय ध्वजारोहण उपसरपंच शरद माणिकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
1️⃣आराध्या विजय घडेकर-
निबंध स्पर्धा- प्रथम क्रमांक.
चित्रकला स्पर्धा- द्वितीय
क्रमांक.
वकृत्व स्पर्धा-उत्तेजनार्थ
2️⃣भाविका चेतन खेलवाडे-
वकृत्व स्पर्धा-द्वितीय क्रमांक
3️⃣निखिल संजय पाटील –
चित्रकला स्पर्धा -उत्तेजनार्थ
तसेच सन 2021 22 यावर्षी इयत्ता तिसरी मध्ये एमटीएस परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
1️⃣ आराध्या विजय घडेकर
केंद्रातून द्वितीय क्रमांक
2️⃣ भूमी वीरेंद्र पाटील
3️⃣ तृप्ती योगेश पाटील
4️⃣ रिजवान हकीम पटेल
5️⃣ गायत्री प्रमोद मालठाणे
6️⃣ गायत्री प्रल्हाद पाटील
7️⃣ शुभम उल्हास वाघ
8️⃣ सिद्धांत प्रवीण पाटील
9️⃣ वैभव सतीश पाटील
कार्यक्रमासाठी गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. लताताई सुभाष देवकर उपसरपंच शरद पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी खेलवाडे पोलीस पाटील, संतोष खेलवाडे,महेंद्र पाटील, सुभाष देवकर ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आरोग्य कर्मचारी स्टाफ अंगणवाडी कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.