जळगाव, (प्रतिनिधी)- जय बजरंग मित्र मंडळ मेस्को माता नगर जळगाव येथे 15 ऑगस्ट 75 व्या रौप्य महोत्सव निमित लहान मुलांचा देशभक्ती पर गीताचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी लहान मुलांना बिस्कीट व चॉकलेट वाटप करण्यात आली.
उत्कृष्ट गितगायन करणाऱ्या मुलांना बक्षिसे देण्यात आली यावेळी तुलसी गोवर्धन फाउंडेशनचे आकाश सुरेश सोनवणे तसेच आमदार राजू मामा भोळे कैलाश सोनवणे तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.सुमन सोनवणे,रोहन सोनवणे,मिलिंद सोनवणे,तुषार राणे,मयूर राणे,ललित कोळी,निलेश कोळी,ललित पाटील,सोपान पाटील,मयूर पाटील,शेखर पाटील,आकाश पाटील,नाना धनगर आदी उपस्थित होते.