वाडी शेवाळे, (प्रतिनिधी)- आज 15 ऑगस्ट 2022 सोमवार रोजी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शांतीलाल नाथमाल जैन माध्यमिक विद्यालय वाडी शेवाळीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रभात फेरीचे आयोजन केले.
प्रभात फेरी प्रसंगी स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रकाश एकनाथ पाटील वाडी गावचे सरपंच नंदू दादा पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय रमेश नाना पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ यांनी प्रभात फेरीच्या वेळेला भारत माता की जय अशा घोषणा देऊन प्रभात फेरी कामी प्रोत्साहन दिले.