मुंबई –राज्यातल्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात सरकार नवं स्थापन झाल्यानंतर त्याला कुठेतरी पुर्णविराम मिळेल अशी शक्यता होती. परंतु राजकीय घडामोडी काही थांबलेल्या नाहीत. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोज नव्याने नवे आरोप केले जात आहेत. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील टीका करत संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप आहे.
रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी युती केली आहे. शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा देखील आठवले यांनी राऊत यांच्यावरती आरोप केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली नसती तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकारं आलं असतं असं देखील ते म्हणाले.
हे पण वाचा :
अजय देवगणच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर घालताय धुमाकूळ, तुम्ही फोटो पाहिलेत का?
जळगावात तरुणाच्या हत्येने खळबळ, तीन जणांना घेतले ताब्यात
बँकेत नोकरीची मोठी संधी…तब्बल 6000 हून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
भरधाव ट्रेनसमोर ट्रॅक क्रॉस करायला गेली महिला अन्…; पहा धक्कादायक Video
शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली नसती तर महाविकास आघाडी कधीच तयार झाली नसती. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे सरकार असतं. यापूर्वी रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप करत पवारांनी पक्षाला पद्धतशीरपणे संपवण्याचं काम केलं आहे. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसला हे आमच्यापैकी कुणालाही मान्य नाही. एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलले नसते तर सेनेकडे 10 आमदारही शिवसेनेचे राहिले नसते असे रामदास कदम म्हणाले होते. “मी 52 वर्षे पक्षात काम केले आणि शेवटी माझी हकालपट्टी झाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांचे मी आभार मानतो असंही त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.