जळगाव : जळगावमध्ये तरुणाच्या आत्महत्येचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तब्बल दीड महिन्यानंतर या घटनेबद्दल महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. आमचे प्रेम प्रकरणाबाबत का सांगीतले? तुला आम्ही नंतर पाहून घेऊ अशी धमकी दिल्याने भितीपोटी एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २६ मे रोजी घडली आहे. याप्रकरणी अखेर प्रेमीयुगलाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर राजेंद्र धनगर (वय १८, रा. वर्डी ता.चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसात दाखल तक्रारीनुसार, काजल गणेश धनगर (रा.नरवाडे, ह.मु. डांभूर्णी ता. यावल) आणि विक्की उर्फ वैभव प्रकाश माळी (रा. नरवाडे ता.चोपडा) या प्रेमीयुगलाने चंद्रशेखरल धनगर यास धमकावले होते. दोघं संशयितांनी चंद्रशेखरला तू आमच्या प्रेम प्रकरणाबाबत का सांगितले? तुला आम्ही नंतर पाहून घेऊ, अशी धमकी दिली होती. या भीतीपोटीच चंद्रशेखरने गळफास घेऊन २६ मे २०२२ रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती.
हे पण वाचा :
फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर जाणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण
अरे बापरे.. भाजपचे श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल
अरे बापरे.. ! 59 वर्षीय व्यक्तीचा 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या दोन मुलींवर बलात्कार
याप्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर चंद्रशेखर यांचे वडील राजेंद्र भिका धनगर वय ४८ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी चोपडा शहर पोलिसांत काजल धनगर व विक्की माळी या प्रेमीयुगलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनशाम तांबे हे करीत आहेत.