दिल्ली – शिवसेनेचे बंडखोर आमदारांच्या गटातील एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेण्यासाठी शिवसेनेने आज मागणी केली असता १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी घेण्यासाठी घटनापीठ नेमावे लागणार असल्याचे कोर्टाने सांगितलं आणि घटनापीठ नेमण्यासाठी वेळ लागणार असल्याचे देखील कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज सुप्रिम कोर्टाकडून शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने दिल्या ‘या’ सूचना
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर जो पर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत त्या १६ आमदारांवर कारवाई नको अशा सूचना विधानसभा अध्यक्षांना कोर्टाने दिल्याचे समजते.मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास आज नकार दिला आहे. तसेच सुनावणी होईपर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको असं देखील न्यायालयाने म्हंटल असल्याचं समोर आलं आहे.
शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी आज न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत सुनावणी घेण्याची वनंती केली. मात्र न्यायालयाने तूर्तास तरी याबाबत सुनावणी करण्यास नकार दिला आहे. यामुळे शिंदे गटाला चांगलाच दिलासा मिळालाय. याबाबत विधानसभा अध्यक्षांना देखील सुप्रीम कोर्टाच्यावतीने सूचना देण्यात आल्या आहेत