मुंबई : एक, दोन लोक पळून घेले म्हणजे शिवसेना संपली असे म्हणता येणार नाही, शिवसेनेत झालेली बंडखोरी हे कृत्रिम वादळ आहे, ही वावटळ दूर होईल शिवसेना पुन्हा एकदा नव्या दमाने उभी राहील, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांचा समाचार घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला काहीही फरक पडला नाही. मालेगाव, नांदगाव इथले कार्यकर्ते मला भेटून गेले. नाशिक महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता येईल. मात्र ज्यांनी शिवसेना सोडली ते परत कधीही निवडून येणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी संजय राऊत यांनी नव्या सरकारवर देखील निशाणा साधला आहे. ही सत्ता कायदेशीररित्या स्थापन झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेकडेच
सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र दुसरीकडे धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेकडेच राहणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसैनिकांना शिवसेनेमुळे चांगले दिवस आले. मात्र त्यांना शिवसैनिकांना संपवायचे आहे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे. भाजपावाले माझ्यबद्दल बोलत नाहीत. मात्र हे 40 बंडखोर बोलत आहेत. ते रोज वेगळ काहीतरी बोलत आहेत. शिवसेना का सोडली तर त्याचे दररोज एक नवे कारण देत आहेत. आतापर्यंत चार कारणे दिली. उद्या पाचवे कारण देतील असे राऊत यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा :
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ; शिवसेनेचे ५५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटात
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर हल्लेखोराने झाडल्या गोळ्या, प्रकृती गंभीर
ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप ; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला राजीनामा
राज्यात कोसळधार! या भागात पुढचे चार ते पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता
शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना शिवसैनिकांना संपवायचे आहे. शिवसेनेमुळे शिवसैनिकांना चांगले दिवस आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच नाशिकमध्ये शिवसेना स्थिर आहे. इथे काहीही फरक पडला नसून, महापालिकेत शिवसेनेची सत्ता येईल असेही राऊत यांनी म्हटले आहे.