नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना नारा शहरात भाषण देत असताना एका हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. आबे यांच्यावर गोळी झाडल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले.
हल्लेखोराने शिंजोनवर हल्ला करताच तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराकडून बंदूक हिसकावून घेतली आणि त्याला जमिनीवर पाडले. जपानच्या एनएचके वर्ल्ड न्यूजच्या वृत्तानुसार, यामागामी तेत्सुया असे हल्लेखोराचे नाव सांगितले जात आहे, त्याचे वय 41 वर्षे आहे. मात्र, त्याने शिंजोला का गोळ्या झाडल्या हे अद्याप समजू शकलेले नाही.
हे पण वाचा :
ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप ; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला राजीनामा
राज्यात कोसळधार! या भागात पुढचे चार ते पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता
..म्हणून मी बंडखोरी केली.. आ. चिमणराव पाटलांची धक्कादायक ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसंच्या तसं
शिंजो आबे यांच्या छातीवर गोळी झाडल्यामुळं ते स्टेजवरच कोसळले. तसंच, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना सीपीआर देण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याचं कळतंय.