अमळनेर: तालुक्यातील शिरूड येथे एक हृदयदायक घटना समोर आलीय. चिमुकल्यासह आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आलीय. पूर्वी सोनवणे आणि वृषांत सोनवणे असं मृत माय-लेकाचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे समजते. कौटुंबिक वादातून महिलेकडून हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान, अमळनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील माहेर असलेल्या पूर्वी सोनवणे यांचे सासरी वाद सुरू होते. त्यामुळे पूर्वी सोनवणे या मुलगा वृषांत याच्यासोबत माहेरी आईवडिलांकडे वास्तव्याला होत्या. दरम्यान मध्यरात्री त्यांनी मुलाला गळफास देवून नंतर स्वत:ही गळफास घेवून आत्महत्या केली. शुक्रवार १७ जून रोजी सकाळी पूर्वी सोनवणे यांचे वडील वसंत पाटील हे वरच्या मजल्यावर गेले असता मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
हे पण वाचा :
पाचोरा रेल्वेस्थानक आवारात आढळले तब्बल इतक्या लाखाचे दागिने
गुडन्यूज ! आता जनरल तिकिटावर करता येणार प्रवास, मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये सुविधा
हतनूर पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी ; धरणाचे ४ दरवाजे उघडले
मुलीसह नातवाचा मृतदेह पाहून वसंत पाटील यांनी मोठा आक्रोश केला. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व ग्रामस्थांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. पूर्वी सोनवणे सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे समजते. मात्र या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नसल्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, अमळनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.