जळगाव – जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज खान्देश एजुकेशन सोसायटीला भेट दिली . यावेळी त्यांचे अध्यक्ष डॉ नंदूकुमार बेंडाळे यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागतकेले .
यावेळी आमदार राजू मामा भोळे हजार होते. . यावेळी संस्थेच्या भावी नियोजनबाबत डॉ. बेंडाळे यांनी माहिती दिली. तसेचखा. उन्मेष पाटील यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी एम जे महाविद्यालयातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेच्या भरभराटीसाठी जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईन. त्यासाठी अग्रसेर राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली. संस्थेचे कोषाध्यक्ष सुरेश चीरमाडे, नियोजन कमेटी सदस्य हरीश मिलवाणी , क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जी एम फाऊंडेशन चे अरविंद देशमुख, जयेश ठाकूर , स्वप्नील भांडारकर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.