मुंबई : राज्यात दोन ते अडीच महिन्यानंतर एक हजारावर कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली आहे. वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. आज (गुरुवारी) सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईसह राज्यभरात करोना पुन्हा डोकं वर काढत असताना बैठकीतील निर्णयांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
वाढत्या करोना रुग्णसंख्येचं कारण काय?
मागील दोन महिन्यांमध्ये करोना रुग्णसंख्या जेमेतम १०० चा टप्पा पार करत होती. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारच्या दिवसात शहरात पाचशेहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली. वाढते पर्यटन, इतर देशांमध्ये वाढणारी करोना रुग्णसंख्या आणि तिथून येणारे पर्यटक, कोव्हिड चाचण्यांचे कमी झालेले प्रमाण, तसेच विषाणूच्या बदलत्या स्वरुपात करोनाचा फैलाव पुन्हा होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
हे पण वाचा :
आज राज्यातील ‘या’ भागात पूर्वमोसमी पावसाची शक्यता
सरकारच्या या निर्णयामुळे मद्यप्रेमींची गैरसोय होण्याची शक्यता, काय आहे जाणून घ्या?
जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! ATM फोडून 9 ऐवज लांबवला
धक्कादायक ! पाचोऱ्यात 80 वर्षीय वृद्धेचा विळ्याने गळा चिरला
मुंबईत १२ ते १८ मे या कालावधीत १,००२ नव्या करोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली होती. १९ ते २५ मे या कालावधीत १ हजार ५३१ रुग्णांची नोंद झाली होती. याच कालावधीत पुण्यातील रुग्णसंख्येत ९.७३ टक्क्यांनी घट पाहायला मिळाली. पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये झालेली रुग्णवाढ ही ३५.८६ टक्के आहे. म्हणजेच रुग्णवाढीचा वेग धीमा असून मृत्यूसंख्या वाढलेली नाही.