मुंबई : राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे पेपर पूर्णपणे तपासून झाले असून लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे परीक्षा उशिरा घेण्यात आल्यात त्यामुळे बोर्डासमोर निकाल वेळेत लावण्याचं मोठं आव्हान होतं. तरीही यंदा हे निकाल वेळेतच लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही यासंबंधीची माहिती दिली होती. दहावी आणि बारावीचे स्टेट बोर्डाचे निकाल येत्या पंधरा दिवसांमध्ये जाहीर करण्यात येतील अशी माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती. त्यानुसार आता दहावी आणि बारावीच्या बोर्डाचे निकाल हे पुढील दहा दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
बोर्डाचे दहावी परीक्षेचा निकाल हा येत्या 20 जूनपर्यंत तर बारावी परीक्षेचा निकाल हा 10 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणायची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी राज्य शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या एकूण माहितीवरून याच तारखांवर शिक्कामोर्तब होणार अशी शक्यता आहे. .तसंच राज्यातील सर्व शहरांमध्ये शिक्षक जोमानं पेपर तपासणीला लागले होते. त्यात काही भागांमध्ये तांत्रिक अडचणीही आल्या. मात्र आता याचा सामना करून बोर्डानं पेपर तपासणी पूर्ण केल्याचं सांगितलं आहे. मूल्यांकनाच्या एकूण सर्व प्रक्रियेनंतर बोर्डाचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
हे पण वाचा :
जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! ATM फोडून 9 ऐवज लांबवला
धुळ्यातील एलआयसी एजंटच्या घरावर पोलिसांची छापेमारी, घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड
एकनाथ खडसेंसह इतर चौघांना ED ची नोटीस ; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
मी जर ती सीडी बाहेर काढली तर..; धनंजय मुडेंबाबत करुणा शर्माचे खळबळजनक वक्तव्य
असा चेक करा निकाल
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
“निकाल पहा” बटणावर क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी / 10वीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
भविष्यातील वापरासाठी Save करा.