जळगाव । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावल्याची बातमी ताजी असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना नुकतीच एक नोटीस पाठवली आहे. खडसेंसह इतर चौघांनाही नोटीसा पाठवण्यात आल्या असून पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या 11 मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत नोटीसीद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ईडीने एकनाथ खडसे यांना ही नोटीस मनी लाँडरिंग अंतर्गत बजावली असून मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळा, सूरत येथील फ्लॅट्स, बंगले, भूखंड, जमिनी आदी ठिकाणी असलेल्या मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत सांगितले आहे. खडसेंसह त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश चौधरी, इन्शिया मुर्ताझा बादलावाला, उकानी आदी या सर्व मालमत्तांचे मालक आहेत. या सर्व मालमत्तांवर ईडीने पीएमएलए अॅक्ट अंतर्गत ऑगस्ट 2021 मध्ये टाच आणली होती.
हे पण वाचा :
भयंकर ! बाहुलीला फाशी दिली, बहुली सोडून गेल्याची समज करून ८ वर्षीय मुलीनेही घेतला गळफास
सोनिया आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस, ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावले
तुमच्या कमाईशी संबंधित ‘हे’ 5 नियम आजपासून बदलणार, जाणून घ्या काय आहेत
खुशखबर.. LPG गॅस सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर
सदर नोटीस मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता रिकाम्या करण्यात याव्यात. तसे न झाल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या करण्याचा अधिकार ईडीकडे असेल, असे या नोटिशीत लिहले आहे. याशिवाय संबंधित मालमत्ता हस्तांतरण, विक्री, भाडेकरारावर देण्यास परवानगी दिली जाऊ नये, अशी माहिती नोटीशीमार्फत नोंदणी महानिरीक्षक तसेच नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, सूरत येथील जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आलेली आहे.