जळगाव : मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात विज पडून जिवीत हानी होत असते. विज पडून जिवीत हानी होऊ नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजन म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी ‘दामिनी’ ॲप तयार करण्यात आले असून सदरचे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधिनस्त तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, गाव स्तरावील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवा, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंयाचत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे तसेच सदरचे ॲप जीपीएस लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटापूवी सदरच्या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.
हे पण वाचा :
फेसबुकद्वारे झाली मैत्री, नंतर तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले, मग् पुढे जे झालं ते धक्कादायकच
‘आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमुकलीचा Video व्हायरल
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भांडण, प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल!
जळगावात MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने उचलले टोकाचं पाऊल, बहिणीच्या घरात घेतला गळफास
टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे आता जळगावमध्ये, अॅड. विजय दर्जीला अटक
करीता आपले अॅप मध्ये आपले सभोवताली विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना निर्देश देण्यात यावे. तसेच इतर सामान्य नागरिक यांना हे ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे. याबाबतच्या सूचना आपले स्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात. तसेच याबाबत आपले स्तरावरुन व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन दामिनी ॲप गुगल प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत माहिती द्यावी.
गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना सदर ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्रापत होणाऱ्या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जिवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.