कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर देखील बोलावलं होते. मात्र संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार कोण? अशी चर्चा रंगली आहे. अशातच आता शिवसेनेने आपला उमेदवार ठरवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक संजय पवार यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आले आहे. शिवसेनेने औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरूरचे माजी आमदार शिवाजीराव आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यासह संजय पवार यांचे नाव सध्या चर्चिले जात आहे. कालपर्यंत संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचे उमेदवार असल्याची चर्चा सुरू होती. दुपारी बारावाजेपर्यंत त्यांनी निर्णय द्यावा, असे सांगण्यात आले होते. मात्र संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.
हे पण वाचा :
आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या किमतीत घसरण, जाणून घ्या या मागील कारणे
कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री टोपेंचे महत्वाचे विधान.. म्हणाले
खबरदार ! रेल्वेने प्रवास करताना ‘ही’ चूक केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंडही आकारला जाईल
सोन्या-चांदी पुन्हा वधारली ; खरेदीला जाण्यापूर्वी चेक करा नवीन दर
कोण आहेत संजय पवार?
संजय पवार हे कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मागील जवळपास 25 ते 30 वर्षे त्यांनी शिवसेनेत काम केले आहे. ते सध्या जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. ते मूळ ग्रामीण भागातील आहेत. यावेळी ग्रामीण भागातील उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. एकीकडे संभाजीराजे अपक्ष म्हणून लढणार आहेत. तर त्यांना शह देण्यासाठी सर्वांशी संवाद असलेला उमेदवार शिवसेनेला हवा आहे. त्यादृष्टीकोनातून सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजे विरुद्ध संजय पवार असा सामना याठिकाणी पाहायला मिळणार आहे.