जळगाव : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने इंधनावरील एक्साइज ड्यूटी कमी केल्याने वाहनधारकांना माेठा दिलासा मिळणार आहे. आजपासून पेट्रोल ९. ५० पैशाने तर डिझेल ७ रुपयाने स्वस्त झाले आहे. मात्र पेट्राेल व डिझेलचे दर कमी हाेणार असल्याने पंप चालकांना सुमारे तीन काेटींचा भुर्दंड साेसावा लागण्याची शक्यता आहे. शनिवार व रविवार लक्षात घेता जिल्ह्यातील २०० पंपांवर सुमारे ३० लाख लिटरचा साठा आहे.
नव्या दरांनुसार जळगाव शहरात पेट्राेल प्रतिलिटर ११२ रुपये १९ पैसे तर डिझेल ९७ रुपये ३४ पैसे मिळण्याची शक्यता आहे. कर घटवल्याने इंधनाच्या दरात हाेणारे बदल सुखावणारे आहे.
हे पण वाचा :
घ्या आता.. करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीलाच पळवून नेले ; सासरवाडीतील मंडळी हैराण
सुवर्णसंधी.. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव येथे 105 जागांसाठी भरती, असा करा अर्ज
जामनेर तालुक्यातील तरुणाचा नकली नोटा छापण्याचा पराक्रम; प्रात्यक्षिक VIDEO पाहून पोलिसही चक्रावले
बायकोला प्रियकराच्या मिठीत पाहिलं, हताश पतीने सुसाईड नोट लिहून घेतला गळफास
जळगाव जिल्ह्यात सुमारे २०० तर जळगाव शहरात २० पेट्राेल पंप आहेत. शनिवार व रविवारी सुटी असल्याने पंप चालकांकडून शुक्रवारीच इंधनाचा साठा करून ठेवला जाताे. शुक्रवारी सर्वच पंपांवर सुमारे १८ ते २० हजार लिटर पेट्राेल व डिझेलचा साठा झाला आहे. केंद्राचा निर्णय सायंकाळी प्राप्त झाल्यानंतर सर्वच इंधन विक्रेत्यांसाठी माेठा धक्का ठरला आहे. शनिवारपासून कमी दराने विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक पंप चालकांना सुमारे दीड ते दाेन लाखांचा भुर्दंड सहन करावा लागणार असून, हा आकडा जिल्ह्यात सुमारे ३ काेटी तर शहरात सुमारे ३५ ते ४० लाखांचा असेल असे संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले.