जामनेर : तालुक्यातील कुंभारी सिम येथील शेतकऱ्याच्या घराला भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडलीय. या आगीत संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाली. सोबतच घरात ठेवलेली साडे पाच लाखाची रोकडसह ७ ते ८ क्विंटर कपाशी जळाली आहे. या आगीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
काय आहे घटना?
कुंभारी सिम येथील युवराज पुंडलिक पाटील हे पत्नी, एक मुलगा व एक मुलीसह वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे ८ एकर शेती असून त्यामधून मिळणाऱ्या उत्पनातून ते आपला कुटूंबाचा उदर्निवाह करीत होते. दरम्यान, सध्या गर्मीचे दिवस असल्याने ते काल रात्री बाहेर झोपले होते. मात्र अचानक रात्री घराला आग लागून घरातील सर्व वस्तू जळून खाक झाली आहे.
हे पण वाचा :
दोन मुलांना चालत्या ट्रेनमधून फेकले, नंतर स्वतः मारली उडी; धक्कादायक Video समोर
शिधापत्रिकेत हे अपडेट त्वरित करा, तुम्हाला नेहमीच रेशन मिळेल; येथे जाणून घ्या सोपी प्रक्रिया
आता महाजनांची घरी बसण्याची वेळ आलीय.. खडसे यांचा टोला
एअर होस्टेसचा डान्स पहिला का? Video पाहून फॅन व्हाल!
राष्ट्रवादी आमदाराच्या गाडीला अपघात, बस व कारमध्ये धडक
तसेच युवराज पाटील यांनी गेल्या काही दिवसापूर्वी कपाशी विकून मिळालेले ५ लाख ६० हजार रुपयाची रोकड घरात ठेवली होती. सलग तीन दिवस बँका बंद असल्याने त्यांनी ती रोकड घरातच ठेवली होती, मात्र दुर्दैवाने ती रोकड देखील अर्धवट जळाली आहे. तसेच ७ ते ८ क्विंटल कापूस देखील जळाला आहे. जवळपास १० लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या आगीचा पंचनामा तलाठी सचिन माळी यांनी केला आहे.