जळगाव – अतिमद्यसेवनामुले एकचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली असून अनिल हिम्मत ठाकरे वय ४५ रा. शिव कॉलनी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी कि, शिव कॉलनीत राहणाऱ्या अनिल ठाकरे याला मद्याचे व्यसन असल्याने त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते . यात त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या . मात्र शर्थीच्या उपचारानंतर त्याची प्राणज्योत मालविली . डॉ. प्रवीण पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .