पुणे : खासदारकीची टर्म संपल्यानंतर आता संभाजीराजे यांची राजकीय वाटचाल काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर छत्रपती संभाजीराजे यांनी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. जुलै महिन्यात होणारी राज्यसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. जुलै महिन्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी पाच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे खासदार निवडून जातील. तर सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेवर मी दावा सांगत आहे. या जागेवर निवडून जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मला मदत करावी, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
तसेच संभाजीराजे यांनी आपण स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापन करणार असल्याचेही जाहीर केले.अनेकांनी मला स्वतंत्र पक्ष काढण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर मी स्वराज्य संघटित करण्यावर भर देणार आहे. स्वराज्य ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यात वावगे समजू नये, असे ते म्हणाले.
हे पण वाचा :
अरे वा! आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, कसे जाणून घ्या?
जगाची डोकेदुखी वाढणार ! ‘झिरो कोविड केस’चा दावा करणाऱ्या देशात पहिल्यांदाच लॉकडाऊन लागू
12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती
खळबळजनक ! शेतकऱ्याने आधी ऊस पेटवला नंतर घेतला गळफास
रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारने केली मोठी घोषणा, लवकरात लवकर लाभ घ्या
ते गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मी राज्यसभेची आगामी निवडणूक ही स्वबळावर लढवेन. राज्यसभेच्या सहा जागांसाठी जुलै महिन्यात निवडणूक होत आहे. यापूर्वीच्या संख्याबळानुसार तीन जागा भाजप, एक जागा राष्ट्रवादी, एक जागा शिवसेना आणि एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून जात होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या संख्याबळात बदल झाला आहे. आता भाजपच्या वाट्याला दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी १ जागा जाईल. त्यामुळे सहावी जागा रिकामी राहणार आहे. या जागेवर निवडून येण्यासाठी ४२ मतांच्या संख्याबळाची गरज आहे. सध्या महाविकासआघाडीकडे २७ आणि भाजपकडे २२ मतं आहेत. त्यामुळे मी या सहाव्या जागेवर माझा दावा सांगतो, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.