जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील सुंजवान भागात शुक्रवारी CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एएसआय एसपी पटेल शहीद झाले, तर दोन पोलीस कर्मचार्यांसह 10 सीआयएसएफ जवान जखमी झाले. त्यानंतर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज जारी केला आहे.
या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणारी सीआयएसएफ बस बॅरिकेडवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या हल्ल्यानंतर लगेच गोळीबार सुरू होतो.
#WATCH CCTV footage of the terrorist attack on the bus carrying CISF personnel in the Sunjwan area of Jammu early yesterday
(Source unverified) pic.twitter.com/2TUzFIupZy
— ANI (@ANI) April 23, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू दौऱ्याच्या दोन दिवस आधी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. मात्र, या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचे दोन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. सुंजवान लष्करी भागातील जलालाबादमध्ये शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. सुरुवातील त्याने सीआयएसएफ जवानांनी भरलेल्या बसवर ग्रेनेड फेकले आणि नंतर पुढे उभ्या असलेल्या जिप्सीवर अंदाधुंद गोळीबार केला. हा परिसर मुस्लिमबहुल आहे आणि थोड्याच अंतरावर सुंजवान ब्रिगेड आणि एक CISF आस्थापना आहे. ठार झालेले दोन्ही पाकिस्तानी दहशतवादी फिदाईनच्या हल्ल्यात होते.
शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता दहशतवादी बरमिनीच्या दिशेने मार्गस्थ झाले. ते मुख्य रस्त्यावर आले आणि CISF च्या आस्थापनाकडे जात होते. तेव्हा दहशतवाद्यांनी आधी ब्लॉकवर सीआयएसएफच्या बसवर ग्रेनेड फेकले आणि नंतर गोळ्या झाडून अंदाधुंद गोळीबार केला.